Description
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं… लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं…
ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन…
जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू.
व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे.
त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.
From the Publisher
Warren Buffett Yanche Guntavanuk Mantra
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं… लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं… ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन… जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू. व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे. त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.
खेळण्याच्या वयात कोकच्या 6 बाटल्यांचा संच विकून 5 सेंट्सचा स्वकष्टार्जित नफा मिळवणारे वॉरन बफे! आता गुंतवणूक जगतात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. इतकं उत्तुंग यश मिळवणं त्यांना कसं शक्य झालं?
बेंजामिन ग्रॅहम यांच्याकडे गुंतवणुकीचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर वॉरन बफेंनी आपल्या स्वतंत्र कारकिर्दीला सुरुवात केली. ओमाहामधील आपल्या घरातून कारभार चालवत त्यांनी आर्थिक संपन्नता तर मिळवलीच पण त्याचबरोबर व्यावसायिक जगात नैतिकतेचे नवे मापदंड निर्माण केले.
व्यवसायाची दृष्टी, आकलन व तो चालवणार्या व्यवस्थापकाबद्दल, कर्मचार्यांबद्दल असलेला विश्वास यामुळे वॉरन बफेंनी उत्तमोत्तम निर्णय घेत आपली आगेकूच सुरू ठेवली.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये बर्कशायर हॅथवे या संस्थेचे निवडक शेअर्स घेणारे बफे सध्या या समूहाचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जातात. एकाहून एक अभिनव संकल्पना राबवून त्यांनी या संस्थेला नवी उंची दिली आहे. ‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ हे समीकरण रुजवत त्यांनी गुंतवणूकदारांना आपल्या यशामध्ये भागीदार केलं.
वॉरन बफेंनी जे साम्राज्य उभं केलं आहे त्यामागे आहे तो कित्येक वर्षांचा अभ्यास. भांडवली बाजारात गुंतवणूक करताना त्यांनी इतरांच्या ठोकताळ्यांपेक्षा स्वत:च्या विवेक बुद्धीने केलेल्या विश्लेषणाला महत्त्व दिलं. याच विश्लेषणामुळे त्यांना भांडवली बाजारातल्या अनेक कंपन्यांचे विविध पैलू समजले.
गुंतवणूकदारांकरिता त्यांचे काही महत्त्वाचे सल्ले
1) कंपनी व तिच्या व्यवस्थापकांचा खरा दर्जा पारखून घ्या.
2) कंपनीचे भागधारक कंपनीचे व्यवस्थापक नसतात. त्यामुळे त्यांनी व्यवस्थापनाचं काम अनुभवी व प्रामाणिक व्यवस्थापकांकडेच सोपवायला हवं.
3) ज्या उद्योगव्यवसायातले आपल्याला काहीही माहीत नाही, तिथे पैसा गुंतवू नका.
4) व्यवस्थापकांनी मागितला तरच त्यांना सल्ला द्या. अन्यथा त्यांना त्यांचं काम करू द्या.
5) कायदा कधी म्हणजे कधीही मोडू नका.
6) मालक हे मालकच राहतात आणि व्यवस्थापक हे व्यवस्थापकच असतात; पण तरीही व्यवस्थापकांनी उद्योग-व्यवसायातले भागीदार असल्यासारखंच काम करावं अशी कार्यसंस्कृती निर्माण करायला हवी.
7) शक्यतो बाजारपेठेपासून चार हात दूरच राहा. त्यामुळे तुम्हाला तुमचा उद्योग व्यवस्थित समजेल.
सर्वसाधारणपणे वॉरन बफे हे दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून जगभर ओळखले जातात; पण जर आपण बफेंच्या मालकीची कंपनी बर्कशायर हॅथवेची यादी पाहिली तर आपण आश्चर्यचकित व्हाल की, 67 कंपन्यांमधील त्यांची मालकी भागीदारी 90 ते 100 टक्के आहे. या सहायक कंपन्या विविध ग्राहक बाजारपेठेत प्रमुख किंवा नियंत्रणकारक भूमिकेत आहेत आणि संयुक्तरीत्या109 अब्ज डॉलर्स (2017) चे उत्पन्न मिळवतात.
वॉरन बफेंच्या यशाचा मूलमंत्र आहे – ‘योग्य व्यवसायाची निवड’. होय, एक गुंतवणूकदार म्हणून व्यावसायिक जीवन सुरू करण्याच्या बर्याच आधी बफेंनी या रहस्याचा शोध लावला होता की, सर्व व्यवसायांचे अर्थशास्त्र एकसारखे नसते; पण काही विशिष्ट प्रकारचे व्यवसाय असे असतात की, त्यांचे अर्थशास्त्र स्वाभाविकपणे अधिकाधिक काम त्यांच्या बाजूने करते. त्यांनी हे ओळखले होते की, एखाद्या व्यवसायाचे अंतर्निहित अर्थशास्त्र जेव्हा त्या व्यवसायाचे समर्थन करत असते तेव्हा, त्यांना आपल्या कमाईच्या तुलनेत फारच कमी भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता असते किंवा ते अशा प्रकारचे व्यवसाय बहुधा‘व्यापारिक नाव’ (ब्रॅँड)असलेली अशी उत्पादने बनवतात ज्यांना कधी बदलण्याची आवश्यकता भासत
नाही, किंवा ते अशी महत्त्वपूर्ण सेवा देतात की, ज्यांचा कोणी पर्यायी प्रतिस्पर्धी नसतो. अशा तर्हेने ते ‘एकाधिकार व्यवसाय’ (Monopoly business)
प्रमाणे असतात. याच कारणाने अशा व्यवसायात ते आपल्या उत्पादन किंवा सेवांची अधिक किंमत वसूल करण्याच्या स्थितीमध्ये असतात, जे त्यांना अधिक चांगला लाभ (Profit Margin) मिळवून देतात.
वॉरन बफेंच्या दृष्टिकोनातून ज्या कंपन्या व्यावसायिक उन्नती, नोकरीची सुरक्षितता आणि दीर्घकालीन लाभ कमावण्याची महान संधी देण्याच्या स्थितीत असतात त्याच कंपन्या मालकी, गुंतवणूक आणि काम करण्यासाठी सर्वांत चांगल्या असू शकतात. वॉरन अशाच कंपन्यांना टिकाऊ प्रतिस्पर्धी लाभ प्रदान करू शकणारा योग्य व्यवसाय मानतात, कारण त्या कंपन्याचे अंतर्गत अर्थशास्त्र त्यांच्या बाजूने काम करते; पण गोष्ट इथेच संपत नाही. त्यानंतर वॉरन बफे त्यातील योग्य व्यवसायाचे गंभीर आर्थिक परीक्षणही करतात.
डॉ. सुधीर राशिंगकर
· ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयात पुणे विद्यापीठातून ‘‘विद्या-वाचस्पती’’ (पीएच.डी.)
· व्यवस्थापन क्षेत्रात संशोधकांचे मार्गदर्शक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात काम.
· गेली चाळीसहून अधिक वर्षं अनेक वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकांतून सातत्याने विविध विषयांवर स्तंभलेखन.
· 30 हून अधिक पुस्तके प्रकाशित.
· काही वर्षं तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कूपर इंजिनिअरिंग व टेल्को (आता टाटा मोटर्स) मध्ये काम केल्यावर 1975 पासून स्वतंत्र व्यवसायात कार्यरत.
· उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षण व संशोधनासाठी लागणार्या यंत्रसामग्री व उपकरणांच्या विपणनाचे भारतभर व शेजारील देशांत काम.
· ‘प्रकल्प व्यवस्थापनाच्या’ क्षेत्रात काही परदेशी कंपन्यांबरोबर काम. गेली चाळीसहून अधिक वर्षं संपूर्ण भारतभर व अन्य पस्तीसहून अधिक देशांत विस्तृत भ्रमण. रोटरी इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व अन्य अनेक पदांवर काम.
· उत्कृष्ट कामाबद्दल रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त. इतर अनेक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था-संघटनांत विविध पदांवर कार्यरत.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; Second edition (15 December 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 208 pages
ISBN-10 : 9352203429
ISBN-13 : 978-9352203420
Item Weight : 220 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : (PH: 9881745605)
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
[ad_2]
Reviews
There are no reviews yet.