Previous
Previous Product Image

Abhinav Year Book 2024 – 7th/Ed. (Marathi) – 1st January to December 2023

Original price was: ₹340.00.Current price is: ₹205.00.
Next

Budha Charitra, Tathagat Bhagwan Gautam Buddha Books in Marathi, Biography Book बुक, गौतम बुद्ध चरित्र मराठी पुस्तक, बुक्स, Dharmanand Kosambi, Jatak Katha : Jataka Tales जातक कथा बुक, Buddhism Sangrah Ani Tyancha Dhamma Aani आणि त्यांचा धम्म dharma and his dhama

Original price was: ₹200.00.Current price is: ₹145.00.
Next Product Image

Description

Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


[ad_1]
आयुष्य बदलण्यासाठी
तुमच्या कामाचं स्वरूप बदला

कर्जांचे हप्ते भरण्यासाठी, मुलांना उत्तम शाळेत पाठविण्यासाठी आणि वर्षातून एकदा पर्यटन करण्यासाठी तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये नऊ ते पाचची नोकरी पत्करण्याची आता गरज नाही. जीवघेणी स्पर्धा सोडून द्या आणि तुमचा स्वत:चा उद्योग सुरू करा. तो करण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटच्या डिग्रीची किंवा भल्यामोठ्या भांडवलाचीदेखील आवश्यकता नाही.
नवीन जीवनपद्धती आचरणात आणण्यासाठी ‘द $ 100 स्टार्टअप’ हिकमती उद्योजकाला मार्गदर्शन करतं. या पुस्तकातून हे शिकायला मिळेल :

तुम्हाला हवं तेव्हा आणि हवं तिथे स्वत:च्या मर्जीनुसार उत्तम कमाई कशी करता येईल?

आवड आणि उत्पन्न याचा परिपूर्ण समन्वय साधून तुम्हाला प्रिय असलेल्या गोष्टीचं उदरनिर्वाहाच्या साधनात कसं रूपांतर करता येईल? 100 डॉलर्स किंवा कमी भांडवलामध्ये ज्या पन्नास सामान्य व्यक्तींनी हे साध्य करून दाखवलं त्यांचा मौल्यवान सल्ला प्रत्यक्षात कसा आणावा?

“विचारांना चालना देणारं, मनोरंजक आणि अत्यंत उत्कंठावर्धक असं हे मार्गदर्शनपर पुस्तक दाखवून देतं की, उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या सामान्य व्यक्ती स्वत:च्या मर्जीनुसार सामर्थ्यशाली आयुष्य कसं उभं करू शकतात?”
– ग्रेचेन रुबीन,
‘द हॅपीनेस प्रोजेक्ट’ या न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकाचा लेखक

From the Publisher

द डॉलर 100 स्टार्टअप : तुमच्या बॉसला निरोप द्या आणि तुमच्या आवडीचं काम करा

The Dollar 100 StartupThe Dollar 100 Startup

आयुष्य बदलण्यासाठी

तुमच्या कामाचं स्वरूप बदला

कर्जांचे हप्ते भरण्यासाठी, मुलांना उत्तम शाळेत पाठविण्यासाठी आणि वर्षातून एकदा पर्यटन करण्यासाठी तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये नऊ ते पाचची नोकरी पत्करण्याची आता गरज नाही. जीवघेणी स्पर्धा सोडून द्या आणि तुमचा स्वत:चा उद्योग सुरू करा. तो करण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटच्या डिग्रीची किंवा भल्यामोठ्या भांडवलाचीदेखील आवश्यकता नाही.

नवीन जीवनपद्धती आचरणात आणण्यासाठी ‘द डॉलर100 स्टार्टअप’ हिकमती उद्योजकाला मार्गदर्शन करतं. या पुस्तकातून हे शिकायला मिळेल :

तुम्हाला हवं तेव्हा आणि हवं तिथे स्वत:च्या मर्जीनुसार उत्तम कमाई कशी करता येईल?आवड आणि उत्पन्न याचा परिपूर्ण समन्वय साधून तुम्हाला प्रिय असलेल्या गोष्टीचं उदरनिर्वाहाच्या साधनात कसं रूपांतर करता येईल? 100 डॉलर्स किंवा कमी भांडवलामध्ये ज्या पन्नास सामान्य व्यक्तींनी हे साध्य करून दाखवलं त्यांचा मौल्यवान सल्ला प्रत्यक्षात कसा आणावा?

“विचारांना चालना देणारं, मनोरंजक आणि अत्यंत उत्कंठावर्धक असं हे मार्गदर्शनपर पुस्तक दाखवून देतं की, उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या सामान्य व्यक्ती स्वत:च्या मर्जीनुसार सामर्थ्यशाली आयुष्य कसं उभं करू शकतात?”

– ग्रेचेन रुबीन, ‘द हॅपीनेस प्रोजेक्ट’ या न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकाचा लेखक

The Dollar 100 StartupThe Dollar 100 Startup

स्तुतिसुमने

‘‘द डॉलर 100 स्टार्टअप’ या पुस्तकाच्या मदतीनं दोन हेतू साध्य करता येतील : ते तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायला प्रेरणा देतं आणि एकदा प्रवास सुरू केल्यावर ते तुम्हाला मार्गक्रमण करण्यासाठी नकाशा पुरवतं. हे पुस्तक वाचल्यावर जर स्वत:चा उद्योग सुरू करण्याची तुमची तयारी झाली नसेल तर तुम्हाला हे पुस्तक पुन्हा एकदा वाचण्याची गरज आहे!’’

– डॅनियल एच पिंक, ‘ड्राइव्ह अ‍ॅण्ड अ होल न्यू माइंड’ या न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकाचा लेखक.

‘‘या मार्गदर्शनात्मक पुस्तकात क्रिस गुलिब्यू दाखवून देतो की, एखाद्या कल्पनेचं रूपांतर एका यशस्वी उद्योगात करणं हे तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा सोपं असू शकतं… कोणत्या कल्पनांसाठी आपला वेळ द्यावा हा निर्णय मात्र सर्वस्वी तुमचा असतो आणि प्रगतीचं पुढचं पाऊल टाकण्यासाठी दररोज सकाळी आपण नव्या उमेदीने जागं व्हावं यासाठी हे पुस्तक आपल्याला मदत करतं.’’

– टोनी हे, ‘डिलिव्हरिग हॅपिनेस’ या न्यूयार्क टाइम्सच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकाचा लेखक आणि Zappos.com चा सीईओ

‘‘तुमच्याकडे असलेला पैसा पुरेसा आहे. क्रिस हे इतक्या स्पष्टपणे समजावून सांगतो की, तुमच्याकडे काहीही सबबी उरत नाहीत. उद्योग सुरू करा अगदी आता. नंतर नाही. त्वरा करा.’’

– सेथ गॉडिन, ‘बुटस्ट्रॅपर्स बायबल’ या न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकाचा लेखक.

‘‘क्रिस गुलिब्यू जे काही करतो ते अत्यंत तळमळीने करतो. या पुस्तकातील कल्पना नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.’’

– क्रिस ब्रोगन, ह्युमन बिझनेस वर्क्सचा प्रेसिडेंट व ‘ट्रस्ट एजंट्स’ चा लेखक

The Dollar 100 StartupThe Dollar 100 Startup

‘‘गुलिब्यूने वर्षानुवर्षे उद्योग चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्यानं व इतर अनेकांनी आपल्याला आवडत असलेल्या कामाचं रूपांतर नफयामध्ये कसं केलं याबाबत तपशीलवार मार्गदर्शन त्यानं या पुस्तकामध्ये केलं आहे. स्वयंपूर्ण उद्योजकांसाठी हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे!’’

– टॉड हेन्री, ‘अ‍ॅक्सिडेंटल क्रिएटिव्ह’ या पुस्तकाचा लेखक

‘‘हे पुस्तक ‘कसे साध्य करावे’ यापेक्षा अधिक मार्गदर्शन करतं, ते ‘या व्यक्तींनी हे कसे साध्य केले’ या प्रकारचं मार्गदर्शन करतं. नवीन उद्योग सुरू करणार्‍या प्रत्येकाला ते या गोष्टीची जाणीव करून देतं की, त्यांना यासाठी खूप मोठ्या भांडवलाची आवश्यकता नाही.’’

– जॉन जॅश, ‘डक्ट टेप मार्केटिंग’ व ‘द रेफरल इंजिन’ या पुस्तकांचा लेखक

‘‘नवोद्योजकांना ज्याची आवश्यकता आहे अगदी तेच हे पुस्तक देऊ करतं : अगदी मर्यादित भांडवलामध्ये नवीन उद्योग कसा सुरू करावा याचा पारखून घेतलेला अत्यंत प्रभावी व व्यवहारचतुर सल्ला.’’

– पामेला स्लिम, ‘एस्केप फ्रॉम क्युबिकल नेशन : फ्रॉम कॉर्पोरेट प्रिझनर टू थ्रायव्हिंग आंत्रप्रनर’ची लेखिका

‘‘करिअरच्या जुन्या पर्यायांची दार बंद झाल्यावर खूप भीती वाटणं साहजिक आहे; परंतु क्रिस गुलिब्यूला अशा परिस्थितीतदेखील संधी दिसते. तुम्हाला अत्यंत प्रिय असलेल्या गोष्टींमधून करिअर बनविणं हे स्वप्नवत वाटेल; परंतु या साध्यासरळ, मनोरंजक पुस्तकातून तो दाखवून देतो की, प्रत्येकवेळी एक साधंसं पाऊल उचलून ते कसं साकार करता येतं.’’

– अ‍ॅलन पॉल, ‘बिग इन चायना’चा लेखक

प्रस्तावना

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारं छोटंसं मार्गदर्शक

अशा आयुष्याची कल्पना करा की, ज्यात तुमचा सगळा वेळ तुम्ही स्वत:ला हवं ते करण्यात घालवलाय.

कल्पना करा की, इतर लोकांना श्रीमंत करणार्‍या मोठ्या यंत्रणेचा एक छोटासा भाग म्हणून काम करण्याऐवजी स्वत: निर्माण केलेल्या प्रकल्पाकडे तुम्ही पूर्ण लक्ष देताय.

कल्पना करा की, तुमच्या बॉसला तुम्ही राजीनाम्याचं असं पत्र देताय,

‘‘प्रिय बॉस, मी तुम्हाला हे कळवू इच्छितो की, तुमच्या नोकरीची मला गरज नाही. आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल आभार; परंतु यापुढे सर्वकाही मी माझ्या मनासारखं करीन.’’

कल्पना करा की, इतर कुणासाठी काम करण्याचा आज तुमचा शेवटचा दिवस आहे. जर असं झालं- अगदी आताच, दूरवरच्या अनिश्चित भविष्यात नाही – तुमच्या घरातील ऑफिसमध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉप उघडून काम सुरू करताय, तुम्ही उघडलेल्या दुकानात तुम्ही प्रवेश करताय, तुमच्या सल्ल्यावर पूर्ण विश्वास ठेवणार्‍या ग्राहकाला फोन करताय किंवा दुसर्‍या कुणी सांगितलेलं काम करण्याऐवजी तुम्हाला हवं असलेलं अजून काहीतरी करताय.

जगभर, अगदी वेगवेगळ्या पद्धतींनी हजारो लोक अगदी तेच करत आहेत. कामाचे नियम नव्याने लिहितायत. आपणच आपले बॉस बनतायत आणि नवीन भविष्याचं निर्माण करतायत.

व्यवसाय करण्याची ही नवीन पद्धत या अनोख्या उद्योजकांमध्ये चांगलीच रुळतेय. यातील बहुतेकांनी स्वत:ला उद्योजक या दृष्टिकोनातून कधीच पाहिलं नव्हतं. सूक्ष्म उद्योगांमध्ये होणारी ही क्रांती आहे- आयुष्याचं उद्दिष्ट गवसणं आणि स्वाधीनता साध्य होताना उपजीविकेचा उत्तम मार्ग सापडणं.

इतर पुस्तकांमध्ये या गोष्टींचा समावेश असतो : इंटरनेट स्टार्टअप उद्योगांचा उदय, सुरुवातीला लागणार्‍या भांडवलाविषयी ओरड, स्वत: भाजीपाला पिकवून ते शिजविणारी रेस्टॉरंट्स. इतर गाइड्स तुम्हाला एखाद्या नवीन उद्योगाची संकल्पना ऐंशी पानांत कशी मांडावी ते सांगतात, जी कोणीही कधीही वाचणार नाही आणि उद्योग खरोखर कसा चालतो याच्याशी त्या पानांचा काडीमात्र संबंध नसतो.

हे पुस्तक अगदी वेगळं आहे आणि त्यात दोन कळीच्या गोष्टी आहेत : स्वाधीनता (Freedom) आणि मूल्य (Value). आपण सर्वजण स्वाधीनतेचा शोध घेत असतो आणि मूल्य हा ते साध्य करण्याचा मार्ग आहे.

ध्यानात घ्या की, हे पुस्तक इंटरनेटची मोठी कंपनी स्थापन करण्याबाबत नाही आणि हे पुस्तक कोट घालून बँकेमध्ये पैशाची भीक मागून साचेबद्ध उद्योग सुरू करण्याबाबतही नाही. त्याऐवजी या पुस्तकात अशा लोकांच्या कथांचा समावेश आहे ज्यांना त्यांची स्वप्नं जगण्याचा मार्ग मिळालाय आणि ज्या गोष्टीची त्यांना तळमळ आहे त्यातून उपजीविकेचं साधन मिळालंय. त्यांच्यासारखं यश इतरांनाही मिळवता आलं तर? ज्या लोकांनी हे साध्य करून दाखवलंय त्यांच्याकडून आराखडा मिळाला तर?

हे पुस्तक माझ्याबद्दल नाही तर ज्या लोकांनी स्वाधीनता मिळवली त्यांच्याबद्दल आहे आणि तुम्हीसुद्धा ती कशी मिळवू शकता याबद्दल आहे. या पुस्तकाच्या संदर्भात मी अमेरिका व कॅनडा यातील त्रेसष्ट शहरांचा दौरा केला (आणि नंतर जवळजवळ पंधराहून अधिक देशांचा) आणि अशा लोकांना भेटलो ज्यांनी ‘बॉस’साठी काम करणं सोडून देऊन स्वत:साठी काम करणं सुरू केलं.

यानंतर पुढील काही वर्षं मी एका छोट्या गटाबरोबर अभ्यास करून, शेकडो मुलाखती घेऊन सर्वसमावेशक असं साहित्य तयार केलं. मोठमोठ्या गठ्ठ्यांतून माहिती पिंजून काढत (मुलाखती, लेखी उत्तरांची चार हजारांहून अधिक पानं आणि फोन वरील शेकडो संभाषणं, स्काइपवरील चर्चासत्रं, आलेली व गेलेली ई-मेल) मी त्याचं संकलन केलं आणि महत्त्वाचे पाठ तयार केले, ‘जे या पुस्तकातून तुम्हाला परीक्षणासाठी व कृतीत उतरविण्यासाठी दिले आहेत. हा स्वातंत्र्याचा आराखडा कोणालाही अनुसरता येण्याजोगा व कृतीत उतरविण्याजोगा आहे. या मार्गात अनेक वेळा तुम्हाला थोडं थांबण्याची संधी मिळेल व स्वत:च्या योजनेवर काम करता येईल आणि इतरांनीही काय केलंय ते शिकणं सुरू ठेवता येईल.

या पुस्तकात उल्लेख आलेल्या काही व्यक्ती जन्मत:च क्रांतिकारी आहेत- ज्यांनी लहानपणीच एकट्याने मार्गक्रमण करायचं ठरविलं; परंतु बहुतांशी व्यक्ती सर्वसामान्य आहेत ज्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत स्वत:साठी काम करण्याचं ठरविलं नव्हतं. अनेकांना कामावरून तात्पुरतं कमी केलं होतं किंवा नोकरीवरून काढून टाकलं होतं आणि अचानक त्यांना खर्च भागविण्यासाठी किंवा कुटुंबनिर्वाहासाठी मार्ग शोधावा लागला होता. (यापैकी बर्‍याचशा व्यक्ती नंतर असं म्हणाल्यात, ‘‘माझी नोकरी जाणं ही माझ्याबाबतीत घडलेली सर्वांत चांगली गोष्ट आहे. माझ्यावर अशी वेळ आली नसती तर मी कधीच ही भरारी घेऊ शकलो नसतो.’’)

ही चूक करू नका : हा आराखडा तुम्हाला कमी काम कसं करावं हे सांगत नाही तर तो तुम्हाला सांगतो की काम चांगल्या प्रकारे कसं करावं. झटपट श्रीमंत कसं व्हावं हे उद्दिष्ट नसून असं काहीतरी निर्माण करणं ज्याचं इतरांना पैसे मोजण्याइतकं मोल असेल हे उद्दिष्ट आहे. तुम्ही फक्त स्वत:साठी उद्योग निर्माण करत नाही तर तुमचा ठसा उमटवताय.

या आराखड्यात कोणतीच रहस्यं, आडमार्ग किंवा चलाखी सामावलेली नाही. मनश्चक्षूसमोर उभं करा व ते वस्तुस्थितीत उतरेल अशाप्रकारचे प्रयोग इथं नाहीत. तुम्हाला असं वाटत असेल की, पैशाचा फक्त विचार करून तुम्ही तो तुमच्या आयुष्यात आणू शकता तर हे पुस्तक बाजूला ठेवा व त्या कामाला लागा. त्याऐवजी तुमच्या भविष्याची जबाबदारी उचलण्यासाठी तुम्ही ज्या कृती स्वत: करू शकता त्याबद्दल हे पुस्तक आहे. तुमच्या स्वतंत्रतेच्या मार्गात तुम्हाला काहीतरी सुंदर निर्माण करण्याची इच्छा असेल तर हे पुस्तक वाचा.

तुम्हाला जे करायला आवडतं ते करत अर्थपूर्ण जीवन जगायला तुम्ही तयार आहात का? हो. ते करत असताना पैसे कमावणं तुम्हाला शक्य आहे का? हो आणि या पुस्तकात अशा व्यक्तींच्या गोष्टी आहेत जे या मार्गावर अग्रेसर आहेत. तुम्ही सध्याच्या कामातून सुटका करून घेतली तर तुमच्याकडे पर्यायी मार्ग आहे का? हो – हा आहे तो मार्ग. तुम्ही ज्या स्वातंत्र्यासाठी आसुसले आहात ते मिळविण्यासाठी हा मार्ग अनुसरा.

Chris GuillebeauChris Guillebeau

क्रिस गुलिब्यू

क्रिस गुलिब्यू हा एक लेखक, उद्योजक व जगप्रवासी आहे.

ऑनलाइन प्रकाशन ते पश्चिम आफ्रिकेमध्ये केलेलं स्वयंसेवकाचं काम अशा विविध उपक्रमांतून काम करत असताना त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच पृथ्वीवरील प्रत्येक देशाला भेट दिली आहे. त्याने ‘वर्ल्ड डॉमिनेशन समिट’ या सृजनशील व्यक्तींसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय मेळाव्याचं यजमानपद भूषविलं आहे. अत्यंत प्रेरणादायी व व्यवहारचतुर असा सल्ला देऊन क्रिस प्रत्येकाला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देतो. ChrisGuillebeau.com या त्याच्या मुख्य वेबसाइटला दरमहा सुमारे 3,00,000 लोक भेट देतात.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 August 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 328 pages
ISBN-10 ‏ : ‎ 935220333X
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203338
Item Weight ‏ : ‎ 300 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

[ad_2]

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The $100 Startup: Fire Your Boss, Do What You Love and Work Better To Live More : द $ 100 स्टार्टअप : Inspirational Entrepreneur Translated Book in Marathi, उद्योजक व्यवसाय, Udyojak Motivational Books, मराठी पुस्तक”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping