Description
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
किरकोळ गुंतवणूकदाराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. लेखक महेश चंद्र कौशिक यांनी गुंतवणुकीशी संबंधित विविध पैलूंची माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडली आहे.
केवळ 100 डॉलर्सची गुंतवणूक वीस वर्षांत 7,18,03,722 डॉलर्स कशी होऊ शकते हे या पुस्तकातून जाणून घ्या.
प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा कमावण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार सांगितले आहे. याचा वापर करून तुम्ही शेअर बाजारातील नुकसान टाळू शकता. या पुस्तकात देण्यात आलेले शेअर बाजारातील सिद्धांत अभ्यासून व त्यांचा वापर करून तुम्हीदेखील भरघोस उत्पन्न मिळवू शकता आणि शेअर बाजारातील आपले यश निश्चित करू शकता.
From the Publisher
Share Bazaratun Paise Kase Kamvave?
शेअर बाजारातून पैसे कसे कमवावे?
किरकोळ गुंतवणूकदाराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. लेखक महेश चंद कौशिक यांनी गुंतवणुकीशी संबंधित विविध पैलूंची माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडली आहे.
केवळ 100 डॉलर्सची गुंतवणूक वीस वर्षांत 7, 18, 03, 722 डॉलर्स कशी होऊ शकते हे या पुस्तकात जाणून घ्या.
प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा कमावण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार सांगितले आहे. याचा वापर करून तुम्ही शेअर बाजारातील नुकसान टाळू शकता. या पुस्तकात देण्यात आलेले शेअर बाजारातील सिद्धांत अभ्यासून व त्यांचा वापर करून तुम्हीदेखील भरघोस उत्पन्न मिळवू शकता आणि शेअर बाजारातील आपले यश निश्चित करू शकता.
महत्त्वाचे दोन शब्द…
शेअर बाजारात व्यवसाय करणे हे वास्तवत: खूप जोखमीचं आहे. तेव्हा कृपया आपल्या प्रोफाइलविषयी आपण स्वत:च विश्लेषण करणे योग्य राहील. स्टॉकची खरेदी आणि विक्री यासंदर्भात सल्ला देणारे हे एकमेव परिपूर्ण पुस्तक आहे असे म्हणता येणार नाही.
या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली माहिती ही केवळ शैक्षणिक स्वरूपाची आहे. त्यामुळे‘शेअर बाजारातील यशाचा मूलमंत्र’ या पुस्तकातील माहितीविषयी आम्ही कसलीही जबाबदारी स्वीकारत नाही.
लेखक सेबी (SEBI) चे एक अधिकृत संशोधन विश्लेषक आहेत. त्यांनी दिलेली माहिती ही त्यांची अभिव्यक्ती आहे. शेअर, विकल्प, भविष्य, बंधन, वस्तू, सूचकांक यांसारख्या कोणत्याही वित्तीय साधनांच्या खरेदी-विक्रीची शिफारस ते करीत नाहीत. त्यांचे हे विचार त्यांच्या विश्वासार्ह स्रोतांवर आधारित आहेत.
गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अधिकारक्षेत्रातील नियामक एजन्सीचा परवाना प्राप्त केलेल्या एखाद्या योग्य गुंतवणूक सल्लागाराशी विचारविनिमय करून स्वत: सर्व सत्यता पडताळून पाहण्याचा सल्ला लेखकाने दिला आहे.
प्रस्तावना
महेश चंद्र कौशिक लिखित हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. प्रस्तुत पुस्तकात किरकोळ गुंतवणूकदार केंद्रस्थानी आहे. गुंतवणुकीसंदर्भात आवश्यक असणार्या बाबींविषयीचे नेमके मार्गदर्शन यात केलेले आहे.
शेअर बाजाराशी संबंधित तांत्रिक शब्दांचा प्रयोग करण्याऐवजी साध्यासोप्या भाषेचा वापर केल्याने हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
शेअर बाजारात प्रथम गुंतवणूक करणार्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवं. शेअर बाजाराशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे यातून मिळतील. शेअर बाजारात काही व्यक्ती सतत कमाई करतात आणि काही व्यक्ती मात्र सतत गमावतात. यामागचं नेमकं कारण या पुस्तकाच्या माध्यमातून लक्षात येईल.
प्रस्तुत पुस्तकामुळे शेअर बाजाराविषयीचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. माझ्या मते, जर एखाद्या व्यक्तीने महेश चंद्र कौशिक यांच्या सिद्धांतांचे आणि सूचनांचे पालन केले तर जसं की, प्रकरण दोनमध्ये सांगितलं आहे त्याची सुरुवातीची 100 डॉलर्सची गुंतवणूक वाढून 20 वर्षांमध्ये ती 7,18,03,722 डॉलर्स होईल. यात मुळीच शंका नाही.
शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या प्रत्येक गुंतवणूकदाराने‘शेअर बाजारामध्ये पैसे कसे कमवावे?’ हे उपयुक्त पुस्तक नक्की वाचायला हवे असे मनापासून सुचवित आहे.
– डॉ. रामस्वरूप पारीक
एम.एस.सी, एम.ए (अर्थशास्त्र)
पीएच.डी. अर्थशास्त्र व्याख्याता,
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय
बोर्ड(सेबी) संशोधक विश्लेषक
लेखकाचे मनोगत
मी एक शासकीय कर्मचारी आहे; परंतु स्वत:चा व्यवसाय करण्याचे माझे एक स्वप्न होते. जेव्हा मी शेअर बाजाराविषयी माहिती मिळवली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, खरंतर शेअर बाजार हा जगातील सर्वांत सोपा आणि बुद्धिमान व चतुर व्यक्तींसाठी अत्याधुनिक असा व्यवसाय आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे स्वतंत्र जागा नसतानाही कमी गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय करू शकतो.
विशेष म्हणजे या व्यवसायात आपल्याला दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करण्याचीदेखील गरज नसते. तात्पुरत्या स्वरूपाचादेखील व्यवसाय आपण करू शकतो. म्हणजेच कमी कालावधीसाठी गुंतवणूक करून पुढे हा व्यवसाय करायचा की नाही हे आपण ठरवू शकतो.
मी माझा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा व्यवसाय 2005 मध्ये सुरू केेला. मी माझ्या या व्यवसायाला ‘शेअर्सचे रिटेल स्टोअर’ म्हणतो. एखाद्या किरकोळ विक्रेत्याप्रमाणे माझा पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये मुख्यत: मौल्यवान अर्थात महाग शेअर्स अगदी कमी प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. याविषयीचे सविस्तर विवेचन या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये उपलब्ध आहे.
अगदी सुरुवातीला माझ्या मित्रांनी मला सांगितले की, सावध राहा, शेअर बाजार छोट्या गुंंतवणूकदारांसाठी फार धोकादायक असतो! त्यांना बहुधा वाटले असावे की, माझी ही गुंतवणूक शेअर बाजारात गमावून मी दिवाळखोर बनेन. त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे; कारण बरेचसे छोटे गुंतवणूकदार हे व्यापारी दृष्टिकोन न बाळगता सट्टा खेळल्याप्रमाणे वागतात. त्यांना हा पैसा कमावण्याचा सोपा मार्ग वाटतो; परंतु मी मात्र नेहमीच माझ्या शेेअर्समधील गुंतवणुकीकडे, व्यापारी दृष्टिकोनातूनच बघतो आणि रिटेल स्टोअरप्रमाणे सर्व व्यवहार करतो. म्हणूनच शेअर बाजारामध्ये मी यशस्वी होत आहे आणि पैसे कमावत आहे.
प्रारंभीच्या काळात मला शेअर बाजाराबद्दल विशेष माहिती नव्हती. मीदेखील आपणा सर्वांसारखा एक छोटा गुंतवणूकदार होतो. नंतर अनुभवातून शिकत मी शेअर बाजारात यशस्वी होण्याचा स्वत:चा सिद्धांत विकसित केला.
आता माझ्याकडे रिसर्च अॅनालिस्टसाठी (शोध विश्लेषक) आवश्यक असणारे एन.आय.एस.एम.चे प्रमाणपत्र आहे आणि मी ‘सेबी’चा रजिस्टर्ड अॅनालिस्ट (नोंदणीकृत विश्लेषक) बनलो आहे.
जवळपास मागील दहा वर्षांपासून शेअर बाजारातील माझे पंधरा वर्षांचे अनुभव मी माझ्या www.maheshkaushik.com या ब्लॉगवर मांडले आहेत.
मुख्यत: मी हे पुस्तक छोट्या गुंतवणूकदारांच्या मदतीसाठी लिहिले आहे. या पुस्तकातील सूचनांची तुम्ही प्रत्येक पायरी-पायरीने अंमलबजावणी केली तर तुमचे कधीच नुकसान होणार नाही.
हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, कशाप्रकारे सुरुवातीची फक्त100 डॉलर्सची गुंतवणूक वीस वर्षांनंतर 7,18,03,722 डॉलर्स बनू शकते!
शेअर बाजारातील व्यापारासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा! या पुस्तकाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत आहे. मी दिलेल्या सिद्धांताविषयी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्याविषयी मला ई-मेल करू शकता. आपल्या शंकांचे निरसन करायला मला नक्कीच आवडेल.
– महेश चंद्र कौशिक
टी.आर.ए.
पिंडवारा, जिल्हा-सिरोही
राजस्थान (भारत)
महेश चंद्र कौशिक
विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हा कलेक्टर कार्यालयात कार्यरत आहेत.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 August 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 168 pages
ISBN-10 : 9352203313
ISBN-13 : 978-9352203314
Item Weight : 180 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
[ad_2]
Reviews
There are no reviews yet.