fbpx
Previous
Previous Product Image

Mossad (Marathi)

$324.00
Next

Balasaheb Shinde – Marathi Vyakaran – Saralseva TCS & IBPS Pattern [paperback] Balasaheb Shinde [Jun 20, 2023]…

$170.00
Next Product Image

Description

Price: ₹200 - ₹130.00
(as of Feb 17, 2024 00:49:00 UTC – Details)लोकप्रिय वक्ता कसे व्हावे? हे या व्यवहार्य, सुगम आणि मौल्यवान मार्गदर्शकातून जाणून घ्या
हे पुस्तक तुम्हाला व्यवहार्य आणि आचरणात आणण्याजोगे सोपे उपाय सांगते, ज्यांच्या मदतीने तुम्ही लोकांसमोर उत्तम प्रकारचे भाषण करू शकाल आणि प्रारंभापासूनच श्रोत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.
प्रस्तुत पुस्तकात डेल कार्नेगी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या वक्त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे विश्लेषण करतात- थेट अब्राहम लिंकनपासून ते रुझवेल्टपर्यंत.
भाषणकलेसाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लेखकाकडून सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणारे प्रसंग आणि निवडक उदाहरणांचे दाखले दिले आहेत.

काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आणि पर्वतासारखी अचल खालील तत्त्वे तुम्हाला मदतीचा हात देतील :
संयम आणि आत्मविश्वास मिळवा
स्मरणशक्ती तल्लख करा
भाषणाची सुरुवात परिणामकारक आणि शेवट छाप पाडणारा करा
श्रोत्यांच्या मनात उत्सुकता जागवा
शत्रुत्व न मिळवता वादविवादात जिंका

व्यावसायिक प्रशिक्षक असलेल्या लेखकाच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे सार या पुस्तकातून समजून घ्या. तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि लोकांसमोर भाषण करण्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवा.

From the Publisher

हाउ टू डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स अॅण्ड इम्प्रूव्ह पब्लिक स्पीकिंग : आत्मविश्वास वाढवा आणि भाषणकला आत्मसात करा

How to Develop Self-Confidence and Improve Public SpeakingHow to Develop Self-Confidence and Improve Public Speaking

लोकप्रिय वक्ता कसे व्हावे? हे या व्यवहार्य, सुगम आणि मौल्यवान मार्गदर्शकातून जाणून घ्या

हे पुस्तक तुम्हाला व्यवहार्य आणि आचरणात आणण्याजोगे सोपे उपाय सांगते, ज्यांच्या मदतीने तुम्ही लोकांसमोर उत्तम प्रकारचे भाषण करू शकाल आणि प्रारंभापासूनच श्रोत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.

प्रस्तुत पुस्तकात डेल कार्नेगी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या वक्त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे विश्लेषण करतात- थेट अब्राहम लिंकनपासून ते?????? रुझवेल्टपर्यंत.

भाषणकलेसाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लेखकाकडून सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणारे प्रसंग आणि निवडक उदाहरणांचे दाखले दिले आहेत.

काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आणि पर्वतासारखी अचल खालील तत्त्वे तुम्हाला मदतीचा हात देतील:

संयम आणि आत्मविश्वास मिळवा स्मरणशक्ती तल्लख करा भाषणाची सुरुवात परिणामकारक आणि शेवट छाप पाडणारा करा श्रोत्यांच्या मनात उत्सुकता जागवा शत्रुत्व न मिळवता वादविवादात जिंका

व्यावसायिक प्रशिक्षक असलेल्या लेखकाच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे सार या पुस्तकातून समजून घ्या. तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि लोकांसमोर भाषण करण्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवा.

Book Review

डेल कार्नेगीच्या विचारातला साधेपणा आणि स्पष्टपणा हा वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही परिघामध्ये गेली कित्येक वर्षं वाचकांना मार्गदर्शन करीत आला आहे. यशस्वी व्यक्तिमत्त्वाची मानसिकता समजून घेतल्यामुळे श्रोते आणि वाचकांना संयुक्त जीवनाच्या निवडीसाठी ते प्रभावीपणे मार्गदर्शन करू शकतात. आपल्या अंगभूत मानवी क्षमता प्रगल्भ कशा करता येतील हे ते थोडक्यात सांगतात आणि त्याचा प्रभावीपणे उपयोग कसा करून घ्यायचा हेही सांगतात. विक्रीकौशल्य असो की पुढारीपण, संपर्ककौशल्य असो की खरेदीविक्री, आनंद असो की समाधान, आपल्यापाशी जेवढी साधनं आहेत त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि आपली संपूर्ण गुणवत्ता कशी संपादन करायची हे कार्नेगी सांगतात. हे पुस्तक वाचा. कार्नेगीच्या लेखनातून आम्ही ते संग्रहित केलं आहे. तुमच्या हक्काचं यश तुम्हाला मिळो हीच सदिच्छा!

How to Develop Self-Confidence and Improve Public SpeakingHow to Develop Self-Confidence and Improve Public Speaking

श्रोत्यांसमोर उभे राहण्याचं धाडस कमवायचं असेल तर ते धाडस तुमच्यामध्ये आधीपासूनच आहे अशा आविर्भावात वागा. अर्थात त्यासाठी तुमची आधीपासून तयारी असायला हवी. काय बोलायचं हे जरी तुम्ही ठरवलं असलं तरी एक क्षणभर थांबा आणि खोलवर श्वास घ्या. खरं म्हणजे श्रोत्यांना सामोरं जाण्याआधी प्रत्येक वेळेस तीस सेकंद खोलवर श्वास घ्यायला हवा. प्राणवायूचा जादा पुरवठा तुमचं धाडस वाढवेल. जेन डी रेझकी हे तर नेहमी सांगत की, श्वासावर तुम्हाला कमांड ठोकता आली तर अस्वस्थपणा क्षणात नाहीसा होता. बोलण्याच्या विषयावर चिंतन केलं नसेल आणि विषयाची जर आखणी केली नसेल तर श्रोत्यांसमोर तुम्हाला सहजपणे उभं राहता येणार नाही. आंधळ्यानं आंधळ्याला वाट दाखवण्यासारखं होईल ते. अशावेळेस नक्कीच अस्वस्थपणा येतो. पश्चात्ताप वाटतो. निष्काळजीपणाची लाज वाटते. थिओडोर रुझवेल्ट आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ‘‘1981 मध्ये मी संसद सदस्य म्हणून निवडून आलो. मी सगळ्यात तरुण होतो. तरुण वय आणि अनुभव नसल्यामुळे बोलण्याची कला शिकताना मला खूप अडचणी आल्या. ड्यूक ऑफ वेलिंग्टन या कडक स्वभावाच्या म्हातार्‍याचा सल्ला मला कामी आला. तो म्हणाला, तुम्हाला जे काही सांगायचं आहे त्याची खात्री असल्याशिवाय बोलू नका. ते जाणून घ्या, मग बोला आणि मग बसा.’

प्रत्येक वेळेस असं करताच येईल असंही नाही; पण एक सहज सांगून टाकतो. सुरुवातीला काही वेळाच याचा उपयोग करा. खुर्चीचा आधार घेऊन उभं राहणारं मूल लवकर आधार सोडून एकट्याने मोकळं उभं राहायला लागतं.

शेवटी जो मुद्दा ठामपणे सांगायचाय तो महत्त्वाचा आहे. आतापर्यंत वाचलेलं समजा

तुम्ही विसरून गेलात तरी हे विसरू नका. पहिला किंवा शेवटचा किंवा कधीही वाया न गेलेला मुद्दा असा आहे की, आत्मविश्चासानं बोलायचं असेल तर एक करा. बोला. त्यासाठी एकच सूचना खूप महत्त्वाची आहे. सराव सराव सराव. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

How to Develop Self-Confidence and Improve Public SpeakingHow to Develop Self-Confidence and Improve Public Speaking

शेक्सपिअरनं लिहून ठेवलेलं आणि जुलियस सीझरच्या प्रेतासमोर उभा राहून मार्क अ‍ॅन्टोनीनं केलेलं भाषण हे सर्वोत्कृष्ट समजलं जातं. परिस्थिती अशी आहे. सीझर सत्ताधीश बनला आहे. साहजिकच अटळपणे त्याच्या राजकीय शत्रूंना त्याचा हेवा वाटायला लागतो. त्याला गादीवरून खाली ओढण्यसाठी, त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि सत्तेवर येण्यासाठी त्याचे असंख्य शत्रू उत्सुक असतात.

ब्रुटसच्या आणि कॅसिअसच्या नेतृत्वाखाली तेवीसजण एकत्र येतात आणि सीझरच्या छातीत खंजिर भोसकतात. मार्क अँटोनी हा सीझरचा सचिव असतो. तो दिसायला सुंदर, चांगला लेखक आणि चांगला वक्ता असतो. जनतेसमोर शासनाची बाजू तो चांगल्याप्रकारे मांडू शकतो. म्हणूनच त्याला सीझरनं आपला उजवा हात मानलं, यात काही नवल नाही. आता सीझरला मार्गातून हटवल्यावर अँटोनीचं काय करतील? त्यालाही हटवतील? त्याला ठार करतील? आधीच खूप रक्तपात झाला होता. त्याचंही समर्थन बरंच झालं होतं. मग या अँटोनीलाच आपल्या बाजूला का वळवू नये? त्याच्या नाकारता न येणार्‍या प्रभावाचा उपयोग का करून घेऊ नये? त्याच्या ओघवत्या वत्तृत्वकलेचा त्यांच्या संरक्षणासाठी उपयोग का करून घेऊ नये? ते सुरक्षित आणि सयुक्तिक वाटत होतं. म्हणून त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी त्याला बघितलं आणि ज्या माणसानं पूर्ण जगावर राज्य केलं त्याच्या शवासमोर दोन शब्द बोलण्याची परवानगी दिली.

अँटोनी व्यासपीठावर चढला. त्याच्या समोर सीझरचं शव पडलेलं होतं. लोक आरडाओरडा करत होते. ब्रुटस, कॅसिअस आणि इतर सहकार्‍यांचे मित्र असल्यानं दूषणं देत होते. अँटोनीला लोकांच्या या जोशाचं रूपांतर द्वेषामध्ये करायचं होतं. या कनिष्ठ लोकांना सीझरला मारणार्‍या लोकांविरुद्ध उठाव करायला लावायचा होता. त्यानं दोन्ही हात वर केले. गोंधळ शांत झाला. त्यानं बोलायला सुरुवात केली. त्यानं ब्रुटसची आणि कट करणार्‍यांची आधी स्तुती करून किती चतुराईनं आणि कौशल्यानं भाषणाची सुरुवात केली ते बघा.

ब्रुटस हा एक आदरणीय माणूस आहे. तसे सगळेच आदरणीय आहेत. सगळ्याच आदरणीय व्यक्तींनो.

असे म्हणत त्यानं कोणताच वाद घातला नाही. हळूहळू त्यानं सीझरविषयीची काही तथ्य मांडायला सुरुवात केली. कैद्यांकडून खंडणी वसूल करून त्यानं आपला खजिना कसा भरून काढला, गरीब जनतेच्या किंकाळ्यांनी त्याला कसं रडू येत असे, त्यानं मुकुट कसा नाकारला, आपली खासगी संपत्ती त्यानं जनतेला कशी वाटली. याविषयीची वस्तुस्थिती त्यानं जनतेसमोर मांडली. प्रश्न विचारले आणि जनतेलाच निष्कर्ष काढू दिले. त्यानं मांडलेले पुरावे नवीन नव्हते; पण जनता ते विसरून गेली होती. ‘‘तुम्हाला माहीत आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे,’’ असे म्हणत त्यानं आपल्या मोहक वाणीनं जनतेच्या भावनांना फटकारलं, भावना चाळवल्या, अनुकंपा जागवली. संताप पेटवला. अँटोनी उत्कृष्ट ओघवतं भाषण इथं संपूर्णपणे दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला साहित्य आणि वक्तृत्वकला शोधता येईल.

Dale CarnegieDale Carnegie

डेल हर्बिसन कार्नेगी

डेल हर्बिसन कार्नेगी

(24 नोव्हेंबर 1888 ते 1 नोव्हेंबर 1955)

सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि वक्ते. स्वयंविकास, विक्रीकला, सहकारी आणि व्यावसायिक क्षेत्राविषयीचे शिक्षण, वत्तृत्वकला, व्यक्ती-व्यक्तीअंतर्गत असणार्‍या संबंधातले कौशल्य, भाषण कौशल्य असे अनेक लोकप्रिय अभ्यासवर्ग चालवणारे ते प्रशिक्षक होते. त्यांचा जन्म मिसोरीच्या एका मळ्यामध्ये गरीब कुटुंबात झाला. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अ‍ॅण्ड इन्फ्लुएन्स पीपल’ (1936) आणि ‘हाऊ टू स्टॉप वरिंग अ‍ॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ (1948) अशा अनेक व्यक्तिमत्त्व विकासविषयक लोकप्रिय पुस्तकांचे ते लेखक आहेत.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 August 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 224 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203259
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203253
Item Weight ‏ : ‎ 220 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “How to Develop Self-Confidence and Improve Public Speaking : Del Carnegie Books in Marathi (dell karnegi) : डेल कार्नेगी मराठी प्रेरणादायी अनुवादीत बुक्स, कारनेगी Translated Book”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping