Description
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.
बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो.
आचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
आचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.
From the Publisher
Budha Charitra
गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले. बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो.
आचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
आचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.
सिद्धार्थ राजकुमार बुद्ध होण्याच्या बेतात आहे, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले, तो आपल्या मनाशी म्हणाला, ‘‘आजपर्यंत कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा अतिक्रम केला नाही; पण हा तरुण राजकुमार मोठा दृढनिश्चयी दिसतो. याने माझा अपमान करून माझ्यापासून स्वतंत्र होण्याचा मोठा खटाटोप चालविला आहे. याचवेळी दमन न केल्यास हा माझ्या हातून कायमचा सुटेल व माझ्याविरुद्ध बंड करावयाला लोकांना उत्तेजन देईल.’’ असा विचार करून माराने तत्क्षणी आपली सर्व सेना सिद्ध केली व सिद्धार्थला चारी बाजूंनी वेढून त्याजवर तुटून पडावयाला आपल्या योद्ध्यांना हुकूम केला.
आक्रोश सुरू झाला. परंतु बोधिसत्त्वांची समाधी तिळमात्र ढळली नाही आणि तो ज्या वृक्षाखाली बसला होता, त्याचे एक पानदेखील हलले नाही. ते पाहून मार अत्यंत संक्षुब्ध झाला व त्याने भयंकर पाऊस पाडावयाला सुरुवात केली. जिकडे-तिकडे महापूर आला; परंतु बोधिसत्त्वाचे आसन कोरडे राहिल्यामुळे आणि पाण्याच्या एका थेंबानेदेखील त्याच्या अंगाला स्पर्श न केल्यामुळे त्याच्या समाधीत मुळीच व्यत्यय आला नाही. तदनंतर माराने पाषाणवृष्टी, शस्त्रवृष्टी, अंगारवृष्टी, तापलेल्या राखेची वृष्टी, तापलेल्या वाळूची वृष्टी आणि तापलेल्या चिखलाची वृष्टी अशी अनुक्रमे निरनिराळी सहा प्रकारची वृष्टी उत्पन्न केली; परंतु त्यांपासूनही बोधिसत्त्वाच्या समाधीला अंतराय झाला नाही.
ते पाहून मार फार खिन्न झाला; तथापि, प्रयत्न न सोडता शेवटी त्याने भयानक अंधकार उत्पन्न केला. ती वैशाख शुद्ध पौर्णिमेची रात्र होती. जिकडेतिकडे शुभ्र चांदणे पडले होते; परंतु बोधिवृक्षाच्या आसपास माराने इतका दाट अंधकार पसरविला की, माराचा गिरीमेखल हत्ती किंवा आसपासच्या पर्वताची शिखरे घुबडांनादेखील दिसेनाशी झाली; पण बोधिसत्त्वाच्या ज्ञानरवीपुढे या मारनिर्मित अंधकाराचे काहीच चालले नाही. त्याच्या समाधीला मुळीच व्यत्यय आला नाही.
आजपर्यंत त्या कडव्या माराला पराभव कसा तो मुळीच माहीत नव्हता. आपल्या स्वतःच्या प्रभावाचा उपयोग करण्याचा प्रसंग त्याला कधीच आला नाही. एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने त्याचे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असता, तो आपल्या फौजेची एखादी लहानशी तुकडी पाठवून त्याला तेव्हाच चित्त करून टाकीत असे. सिद्धार्थ साधारण तपस्वी नव्हता. हे जाणूनच माराने आपल्या सर्व सैन्याला त्याच्यावर एकदम तुटून पडावयाची आज्ञा केली होती; परंतु आपल्या फौजेचा बोधिसत्त्वाकडून सपशेल पराभव होईल, हे त्याच्या ध्यानीमनीदेखील आले नाही. आता तर त्याने जवळजवळ आपली सर्व शक्ती वेचली; पण बोधिसत्त्व काही केल्या त्याला दाद येईना. तेव्हा माराला या प्रसंगी किती दुःख झाले असेल, याची कल्पनाच केली पाहिजे.
आता आपले काळे तोंड घेऊन परत जावे किंवा आपल्या हत्तीवरून खाली उतरून सिद्धार्थावर तुटून पडावे, या दोहोंपैकी माराला एकच मार्ग खुला राहिला होता. आपल्या पराभवाची वार्ता घेऊन माघारी जाणे न आवडल्यामुळे बोधिसत्त्वावर स्वत: हल्ला करण्याचे धाडस करणेच माराला इष्ट वाटले. तो हत्तीवरून खाली उतरला आणि बोधिसत्त्वाजवळ येऊन त्याला म्हणाला, ‘‘सिद्धार्थ, येथून मुकाट्याने चालता हो, नाही तर मी तुझा एका क्षणार्धात माझ्या सैन्याकडून नाश करवून टाकितो.’’
बोधिसत्त्व म्हणाला, ‘‘हे मारा! तुझ्या सैन्याची मला चांगली पारख आहे. नाना प्रकारच्या चैनीच्या वस्तू ही तुझी सगळ्यात पुढे जाणारी सैन्याची तुकडी होय, त्याच्या मागोमाग अरिरती, तहान आणि भूक, तृष्णा, आळस, कुशंका, गर्व, कीर्तीची आशा, आत्मस्तुती आणि परनिंदा या तुझ्या तुकड्या येत असतात. साधारण तपस्व्याकडून यांपैकी एखाद्या तुकडीचा पराजय होणे शक्य नाही; पण मला तुझ्या या सर्व सेनेची मुळीच पर्वा वाटत नाही. कच्च्या मातीचे भांडे जसे दगडाने सहज फोडिता येते, तसे माझ्या प्रज्ञेच्या योगे तुझ्या सेनेचा मला पराभव करता येईल!’’ मार म्हणाला, ‘‘हे जाऊ दे; पण तू ज्या आसनावर बसला आहेस, ते आसन माझे आहे. त्यावर बसण्याचा तुला अधिकार नाही. म्हणून मी म्हणतो, की तू येथून उठून ताबडतोब चालता हो!’’ बोधिसत्त्व म्हणाला, ‘‘मारा! हे आसन तुझे आहे याला पुरावा काय?’’ हा सिद्धार्थाचा प्रश्न ऐकून माराच्या फौजेतील पुष्कळ योद्धे पुढे सरसावले आणि ‘‘हे आसन माराचे आहे याला आम्ही साक्षी आहोत.’’ असे म्हणू लागले तेव्हा मार बोधिसत्त्वाला म्हणाला, ‘‘हा पाहा माझा पुरावा, हे सर्व लोक हे आसन माझे आहे, अशी साक्ष देत आहेत. आता हे तुझे आहे याला काय पुरावा आहे, तो दाखी व नाही तर मुकाट्याने येथून निघून जा.’’
बोधिसत्त्व म्हणाला, ‘‘हे मार! मी अनेक जन्मी दानपारमिता परिपूर्ण केल्यामुळे या आसनावर बसण्यास अधिकारी झालो आहे.’’ मार म्हणाला, ‘‘पण तू दानपारमिता पूर्ण केलीस याला साक्षी कोण?’’ बोधिसत्त्व आपला उजवा हात पृथ्वीकडे करून म्हणाला, ‘‘हे मार, माझ्या पुण्यकर्माला दुसरा कोणी जिवंत साक्षी येथे मिळणे कठीण आहे. ही सर्व सहा सर्वव्यापी वसुंधरा माझ्या पुण्यकर्माला साक्ष देईल!’’
शाक्यांचे राज्य मगध देशाच्या राज्यापेक्षा लहान होते; तथापि शाक्य राजे इश्वाकुलातील असल्यामुळे त्यांना आसपासच्या देशांत फार मानीत असत. शाक्यांनाही आपल्या कुलाचा मोठा अभिमान वाटत असे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीचा असे. या धंद्याला ते फारच महत्त्व देत असत. शुद्धोदन हा शाक्यराजांपैकी एक राजा होता; परंतु त्याला काही काळपर्यंत शाक्यांनी आपला महाराजा केले होते असे वाटते.
सिद्धार्थांचे बालपण मोठ्या सुखात गेले असावे यात शंका नाही; तथापि मधूनमधून व्याधी, जरा आणि मरण या संबंधाने तो विचार करीत असे. याला सुत्तपिटकामध्ये आधार सापडतो. आपल्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी सिद्धार्थाने गृहत्याग केला व सहा-सात वर्षे उरुवेलेच्या आसपास घोर तपश्चर्या केली. आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी सिद्धार्थ बुद्ध झाला. प्रथमत: बुद्धाने पाच तपस्व्यांना काशीजवळ ऋषिपतन नावाच्या उद्यानात आषाढी पौर्णिमेच्या दिवशी उपदेश केला. हा चातुर्मास संपण्यापूर्वीच बुद्धाने साठ भिक्खू आपल्या संघात घेतले व चातुर्मास संपल्यानंतर त्यांना धर्मोपदेश करण्यासाठी सर्व दिशांनी पाठविले. तद्नंतर बुद्धांची मोठी कामगिरी म्हटली म्हणजे त्याने उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप आणि गयाकाश्यप या तिघा सुप्रसिद्ध जटिल बंधूंना त्यांच्या एक हजार शिष्यांसह वर्तमान आपल्या भिक्षुसंघात घेतले ही होय. काश्यपबंधू शिष्य झाल्यामुळे राजगृहातील श्रमणब्राह्मणांवर बुद्धाचे तेज पडावयाला उशीर लागला नाही. राजगृहामध्ये बुद्धाने पुष्कळ शिष्य मिळविले; परंतु या सर्वांत सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोन प्रमुख होते. राजगृहाहून बुद्ध आपल्या भिक्षुसंघासह शुद्धोदन राजाला भेटण् ासाठी कपिलवस्तूला गेला.
तेथे घडलेली मुख्य गोष्ट ही की त्याने आपल्या पूर्वाश्रमातील एकुलत्या मुलाला प्रवज्जा देऊन श्रामणेर केले. बुद्धाला विरोध करणारे जे शत्रू उद्भवले, त्यांत देवदत्ताला अग्रस्थान दिले पाहिजे. देवदत्त शाक्यांपैकीच असून बुद्धाचा जवळचा नातेवाईक होता; तथापि त्याने जितके बुद्धाचे वैर केले, तितके दुसर्या कोणीही केले नसेल. उदयन राजाच्या पट्टराणीनेही बुद्धाची फजिती करण्याचा प्रयत्न केला. परिव्राजकांनी बुद्धावर सुंदरीला मारल्याचा आळ घालून श्रावस्तीमध्ये त्याची बेअब्रू करण्याची खटपट केली; परंतु कोणताही वैरी बुद्धाचे यश मलिन करू शकला नाही. देवदत्ताने आणि इतरांनी बुद्धावर आणिलेले प्रसंग म्हणजे बुद्धाच्या शीलाची एक प्रकारची कसोटीच होती. त्या कसोटीला बुद्ध कसा उतरला, हे मागील काही प्रकरणांवरून निदर्शनाला आलेच आहे. सोने जसे आगीतून तावूनसुलाखून शुद्ध होऊन बाहेर पडते, तद्वत वरील प्रसंगांनी बुद्धाचे यश निर्मल होऊन बाहेर पडते. यज्ञयादिकांना महत्त्व देणार्या वैदिक ब्राह्मणांनी बुद्धाचा फार छळ केला अशी समजूत आहे; पण ती निराधार आहे. बुद्धकाली मध्य देशामध्ये यज्ञयागाला फारसे महत्त्व राहिले नव्हते आणि जे काही थोडेबहुत यज्ञ होत असत; त्यांन अतिशय खर्च येत असल्यामुळे ते सामान्य लोकांच्या आटोक्याबाहेरचे होते. बुद्ध चारी वर्णांना समान मानतो, हाच काय तो त्याच्यावर ब्राह्मणांचा मुख्य आरोप होता. तो वाटेल तेथे भिक्षा ग्रहण करितो, चांडाळ आणि ब्राह्मण या सर्वांना आपल्या संघात समानतत्त्वाने वागवितो व येणेकरून परंपरागत आलेला वर्णभेद मोडू पाहतो, याबद्दल कित्येक वर्णाभिमानी ब्राह्मणांच्या पोटात दुखत असे; पण त्यांच्याकडून शिव्याशापाखेरीज बुद्धाचे म्हणण्यासारखे अहित झाले नाही. बुद्धाला चांडाल वगैरे शब्दांनी संबोधून त्यांच्याशी भांडण करायला सिद्ध झालेले कित्येक ब्राह्मण त्याचे शिष्य झाले, हे काही गोष्टींवरून दिसून येईल.
बुद्धावर आलेले शेवटचे मोठे संकट म्हटले म्हणजे विडूडभाने पसेनदीला पदभ्रष्ट करून शाक्यांचा संहार केला हे असावे. बौद्ध धर्माचा पहिला पुरस्कर्ता राजा बिंबिसार याला त्याच्या मुलाने ठार मारिले. दुसरा राजा पसेनदीकोसल याला त्याच्या मुलाने हाकलून दिले आणि सर्व शाक्य राजांचा नाश केला; पण या ऐहिक संकटांनी बुद्ध डगमगून गेला नाही. त्याने आपले धर्मोपदेशाचे काम तहत देहावसानापर्यंत चालविले होते.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2022); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar, 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 168 pages
ISBN-10 : 935220364X
ISBN-13 : 978-9352203642
Item Weight : 160 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar, 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
[ad_2]
Reviews
There are no reviews yet.