Previous
marathi books

The Art Of Saying No Book in Marathi, Damon Zahariades Books, Anuvadit, Translated, International Best Seller, Bestseller, Bestselling, Best Selling Motivational, Inspirational, Self Help, Personality Development, पुस्तके पुस्तकं, बुक, Positive Thinking : The Power of पॉवर ऑफ पॉजिटिव थिंकिंग पुस्तक मराठी प्रेरणादायी अनुवादीत बुक्स, द आर्ट ऑफ लेटिंग गो, सेईंग नो

Original price was: ₹200.00.Current price is: ₹155.00.
Next

30 DAYS : Change Your Habits, Change Your Life Book in Marathi विचार बदला आयुष्य बदलेल, ह्याबिटस Motivational बुक (प्रेरणादायी अनुवादित मराठी पुस्तक) Inspirational Translated Books पुस्तके, पुस्तकं, बुक्स, Bestseller, best Seller, marc reklau, mark

Original price was: ₹295.00.Current price is: ₹194.00.
marathi books

Mantarlele Divas : मंतरलेले दिवस Book, G D Madgulkar Literature Marathi Sahitya Books मराठी चरित्र पुस्तक, ग दि माडगूळकर साहित्य पुस्तके, Gadima

Original price was: ₹250.00.Current price is: ₹179.00.

गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक;
परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना
‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’,
असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते.
अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते,
जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते,
असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो.
निवेदनातला ऐसपैसपणा आणि खुलेपणा त्यांच्या
उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो.

ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून
त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो.
त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता
वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी
सर्जक प्रतिभा मनाला भावते.

गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना
त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या
लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की,
ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.
– अविनाश सप्रे

From the Publisher

Mantarlele Divas

Mantarlele DivasMantarlele Divas

गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना ‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’, असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते, असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो. निवेदनातला ऐसपैसपणा आणि खुलेपणा त्यांच्या उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो. ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो. त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला भावते. गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.

– अविनाश सप्रे

Mantarlele DivasMantarlele Divas

भूमिका

गदिमा हे मराठी साहित्यसृष्टीला आणि चित्रसृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न. या स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढवला. ‘गदिमा’ हा मराठी संस्कृतीने जपलेला एक मोठा संस्कार ठरला. घराघरांमध्ये, मनामनांमध्ये आणि ओठाओठांवर हा संस्कार मोठ्या श्रद्धेने जपला गेला. ज्याची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली, असा हा महान साहित्यिक होता.

या पुस्तकातील प्रवासात गदिमांना अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यातील पुष्कळांचा त्यांना फार घनिष्ठ सहवास घडला. काही विचित्र वा कटू अशा प्रकारचे अनुभवही आले; पण प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यातच बरेचसे पूर्वायुष्य खर्ची पडले असल्यामुळेे की काय, कुणाविषयीही त्यांच्या मनात कधी अढी राहिली नाही की कटुता राहिली नाही. कलेच्या ध्यासाने ते आपला मार्ग शोधीत राहिले — चालत राहिले. काही व्यक्तींविषयी त्यांना उत्कटपणे वाटणारा कृतज्ञताभावही या वाटचालीतून दृग्गोचर होत राहतो. माणुसकीशी त्यांचे नाते बालवयापासूनच जडलेले होते. समाजातील अस्पृश्य-दलितांविषयी वाटणारी सहृदयता त्यांच्या अनेक चित्रपटांतून स्पष्टपणे दिसून येते. वयाच्या अवघ्या सोळा-सतराव्या वर्षी हा लोकोत्तर कवी असे करुण-विदारक सामाजिक चिंतन आपल्या शब्दांतून व्यक्त करतो, यातच त्याचे थोरपण, त्याची शक्ती दिसून येते:—

‘दगडाच्या देवा, दह्याच्या घागरी,

अस्पृश्याच्या घरी ताक नाही ॥

पाळीव पोपट, गोड फळे त्याला,

आणि अस्पृश्याला कदन्न का?’

Mantarlele DivasMantarlele Divas

त्या वेळची सामाजिक विषमता, बालपणीचे संस्कार-संचित, सूक्ष्म निरीक्षण, कीर्तनांतून ऐकलेले संतजनांचे प्रबोधक अभंग, राजमंदिरात पाहिलेले दह्या-दुधाचे व्यर्थ अभिषेक, माडगूळच्या महारवाड्यात पाहिलेली महार-चांभारांची दैन्य-दारिद्य्रावस्था आणि अतीव कष्ट व झगडा यांच्या धाग्यांनी विणलेले गरीब, हालअपेष्टेचे आयुष्य यांचा ठसा गदिमांच्या या छोट्याशा काव्यात उतरला असावा असे वाटते. यानंतरच्या त्यांच्या प्रौढ-परिपक्व काव्यस्रोतात तर सारा मराठी समाजच आनंदभावनेने चिंबचिंब भिजून गेला.

या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून करुण-व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात.

‘पंचारती’ चित्रपटातील गदिमांच्या एका अभंगात अशा पंक्ती आहेत :

‘गाव जागा झाला

आता उठा पांडुरंगा

उजळली उगवती

जथे पाखरांचे गाती

सकाळच्या कळशीत आली चंद्रभागा…’

या अभंगातल्या रूपकाप्रमाणेच, ज्या ज्या रसिकाने गदिमांच्या काव्यौघात आपली कळशी धरली, त्या प्रत्येकाला त्यांच्या भावसंपद चंद्रभागेचाच अनन्य लाभ झाला!

गदिमा हे मराठी साहित्य-संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. ऋतुपरत्वे अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली. तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उभे होते. असीम दारिद्य्र व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस कृतज्ञ आहे. मराठी मनावर स्वत:ची एवढी दृढ-सखोल छाप ठेवणारा कलावंत विरळाच म्हणावा लागेल. आपल्या रूपाने गदिमांनी साहित्य-चित्रसृष्टीत एक वैभवशाली पर्वच निर्माण केले.

— आनंद अंतरकर

 G. D. Madgulkar G. D. Madgulkar

G. D. Madgulkar

गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी त्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते, त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२), ‘अजून गदिमा’ आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१)

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 November 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 192 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203399
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203390
Item Weight ‏ : ‎ 170 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ (PH: 9881745605)
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Description

Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)

[ad_1]

[ad_2]

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mantarlele Divas : मंतरलेले दिवस Book, G D Madgulkar Literature Marathi Sahitya Books मराठी चरित्र पुस्तक, ग दि माडगूळकर साहित्य पुस्तके, Gadima”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping